WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी कन्या भाग्यश्री योजना – 2023:Majhi Kanya Bhagyashree Yojana 2023मराठी Free

Majhi Kanya Bhagyashree Yojana:

प्रस्तावना

राज्य व केंद्र सरकार आपल्या लाडक्या लेकिसाठी अनेक सरकारी योजना राबवत आहेत. यामधून मुलींच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षेवर भर दिला जात आहे. माझी कन्या भाग्यश्री महाराष्ट्र 2023 या योजनेमुळे मुदत ठेवींच्या निर्मिती साठी रु. 20 कोटी (आर्थिक वर्ष 2017-18) आणि रु. 14 कोटी रुपये (वित्तीय वर्ष 2018-19) वितरित करण्यात आले आहेत.या योजनां मधून अनेक लाभ मिळतात जसे की, मुलींच्या शिक्षणा पासून ते लग्ना पर्यंत येणाऱ्या सर्व खर्चासाठी पालकांना काही रकमेची मदत मिळते.

मुलींसाठी पालकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळतो, त्यामुळे मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात म्हणजे शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठी रक्कम उभी करता येते. पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणीत यातून त्यांना मोठा आधार मिळतोय. या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत मुलगी व तिच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडण्यात येते या योजनेत 1,00,000 पर्यंतचा अपघात विमा व 5,000 रुपया पर्यंतची ओव्हर ड्राफ्ट सुविधा देण्यात येते.

केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 Yojana जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुकन्या योजना राज्यामध्ये लागू केली होती, त्यानंतर या योजनेमध्ये अमुलाग्र बदल करून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना (MKBY 2023) संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.

राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलाच्या मागे 894 इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन  शासन निर्णय अधिक्रमित करून “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र सरकार, राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना व सेवा राबवत असते. याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली. या माध्यमातून महाराष्ट्र राज्या मध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यांच्यामध्ये सुधारणा करणे, मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीच्या नकारात्मक विचारांमध्ये सुधारणा करून,मुलींविषयी सकारात्मकता वाढवणे,तसेच बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलां इतकाच मुलींचा जन्म दर वाढवणे हा उद्देश समोर ठेवून शासनाने राज्यात 2016 मध्ये ही योजना सुरू केली.

योजनेचे उद्दिष्ट, शासनाचा निर्णय, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, इत्यादी माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.आम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी कुटुंब असतील जे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, शिक्षणाची खात्री आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजनेचा राज्यामध्ये शुभारंभ केला. महाराष्ट्र राज्यातील सर्व दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना आखण्यात आली. दारिद्र्य रेषेवरील(APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना सुद्धा काही प्रमाणात या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत अमुलाग्र बदल करून शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना राबवण्यात आली.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2023 प्रमुख उद्दिष्टे

 • राज्यातील विषम लिंग अनुपात सुधारणे.
 • मुलींचा जन्मदर वाढवणे.
 • बालिका भृणहत्या रोखणे.
 • मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून मुलींना स्वयंपूर्ण बनवणे.
 • मुलींच्या जन्माच्या वेळी जन्मोत्सव साजरा व्हावा.
 • जिल्हा तालुका अशा विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांनी एकत्र येऊन काम करावे.
 • सामाजिक  बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था,  शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी  यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे.

* टप्पा 1 : मुलीच्या जन्माच्या वेळी

पहिल्या मुलींसाठी: ५०००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: २५००/- रुपये

* टप्पा-२ : मध्ये मिळणारे व्याज/रक्कम (प्रत्येक सहा वर्षांनंतर ) म्हणजेच प्राथमिक शाळा प्रवेश (इ.१ ली ते ५ वी) याचा वापर मुलीच्या गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चासाठी करणे.

पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी २००/- रुपयांप्रमाणे प्रमाणे ५ वर्षांकरिता एकूण १००००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी १०००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांक

* टप्पा-३ मध्ये मिळणारे व्याज/रक्कम (प्रत्येक सहा वर्षांनंतर ) म्हणजेच माध्यमिक  व उच्च माध्यमिक   शाळा प्रवेश (इ.६ वी ते १२ वी गुणवत्तापुर्वक पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चासाठी करणे.

पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी २५००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांकरिता एकूण १२५००/- रुपये
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी १५००/- रुपयांप्रमाणे ५ वर्षांकरिता १५०००/- रुपये

* टप्पा-४ वयाच्या १८ वर्षी मिळणारे व्याज/रक्कम मुलीच्या कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी दिला जात आहे.

पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी ३०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता एकूण २१०००/- रुपये.
दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी २०००/- रुपयांप्रमाणे ७ वर्षांकरिता २२०००/*- रुपये. यह भी पढ़े

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA FORM:

 • लाभार्थी मुलीचे वडील चे हे महाराष्ट्राचे कायम निवासी असावे.
 • मुलगी व तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेमध्ये संयुक्त खाते उघडलेले असावे.
 • अर्ज करताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक राहील.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना माता पित्याने परिवार नियोजनाचा दाखला देणे आवश्यक आहे.
 • पहिले अपत्य मुलगी असताना, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तरीही त्या या योजनेस पात्र राहतील.
 • लाभार्थी मुलगी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असली पाहिजे व अविवाहित असली पाहिजे(18 वर्षापर्यंत).
 • ज्या कुटुंबाला एका मुलीच्या जन्मानंतर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडे अर्जासोबत जमा करावे.
 • दोन मुलींच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आत कुटुंब नियोजन करून, वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र संबंधित शासकीय अधिकाऱ्याकडे अर्जासोबत जमा करावे.
 • योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 ला जन्मलेल्या तसेच त्यानंतर जन्मलेल्या मुलींनाच लागू राहील.
 • परिवारामध्ये एक अपत्य मुलगा असेल त्या परिवाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • ज्या दाम्पत्याला पहिल्या दोन मुली असून तिसरे अपत्य जन्मल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेच्या अंतर्गत जर मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला तर मुदत ठेवीची रक्कम ठराविक मुदत संपल्यानंतर म्हणजेच 18 वर्षानंतर मुलीच्या पालकांना मिळेल.
 • एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष (६ किंवा ६ वर्षांपेक्षा कमी) इतके असावे.
 • बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ-

1.मुलीचा जन्म झाल्यानंतर आजी आजोबांचा प्रमाणपत्र-

मुलीचा जन्म झाल्यानंतर आजी आजोबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जातो, तसेच 5,000 चे एक सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र दिले जाते

2.गावाचा गौरव

ज्या गावांमध्ये मुला मुलींचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त असेल, तर त्या गावाला माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्याकडून 5,00,000 रुपयांचे पारितोषिक दिले जाते. मिळालेली रक्कम गावाने मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

3.माझी कन्या भाग्यश्री या योजनेत लाभार्थीला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा व 5,000 रुपयां पर्यंतचीओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येते.सदर योजनेअंतर्गत १८ वर्षांनंतर एल.आय.सी. कडून जे रु.१,००,०००/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रु.१०,०००/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरुन संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल.

4.सुकन्या योजना ही माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सुकन्या योजनेच्या अटी व नियम या योजनेसाठी लागू राहतील. तसेच सुकन्या योजनेमधील मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

5.लाभार्थी कुटुंब प्रत्येक सहा वर्षांनंतर जमा व्याज काढून घेऊ शकते.

6.ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील.

7.आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नांवे जमा केलेल्या रक्कमेतून (Corpus | Rs.२१२००/-) नाममात्र रुपये १००/- प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील.
अ) नैसर्गिक मृत्यू : ३००००/- रुपये
आ) अपघातामुळे मृत्यू-७५०००/- रुपये
इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास-७५०००/- रुपये
ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७५००/- रुपये
उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला रुपये ६००/- इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल.

योजेनेचे स्वरूप

माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये पुढीलप्रमाणे 2 प्रकारच्या लाभार्थ्यांना योजनेचे लाभ घेता येतील.

प्रकार-१ चे लाभार्थीएकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
प्रकार-२ चे लाभार्थीएक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

योजनेच्या अंमलबजावणी करीता यंत्रणा व अर्ज करण्याची कार्यपध्दती

 1. सदर योजनेअंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका/महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नांवाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-‘अ’ किंवा ‘ब’ मध्ये अज सादर करावा. अजसोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पत्राचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने प्रकार-१ चा लाभ घ्यावयाचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंबनियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वेदयकीय अधिका-याचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील. सदर अर्जाची छाननी अंगणवाडी सेविकेने करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी सेविकेने पर्यवेक्षिका / मुख्यसेविकेकडे सादर करावा.
 2. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणात्रांची तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिका-यांना व ग्रामीण प्रकल्पा बाबत ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिका-यांमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करण्यात यावी.
 3. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे ऐच्छिकरित्या जास्त संख्या असलेल्या एखाद्या वस्तीची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. तद्नंतर एक महिन्याच्या कालावधीत पडताळणी करुन बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) रुपये २१,२००/- एवढी रक्कम एल.आय.सी. कडे जमा करतील व इतर अनुज्ञेय रक्कम चेकद्वारे संबंधित मुलीच्या आईच्या नावे अदा करतील.
 4. मुलीचा जन्म झाल्यावर तिचे नांव नोंदविल्यावर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका / बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे अज करता येईल. उपरोक्त योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकाच्यांनी मुलीच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. दत्तक मुलींच्या बाबतीत ६ वर्षांपर्यंतच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह नसल्यास अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत अर्जदारास कळवावे. अर्जदारांनी अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जदारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज २ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.
 5. मुलीला एल.आय.सी. योजनेचे लाभ देण्याकरिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्या मान्यतेनंतर मुलीचे पालक जनधन योजनेअंतर्गत बॅक बचत खाते उघडतील आणि त्याबाबतचा तपशिल संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयास कळवतील. सदर अज प्राप्त झाल्यावर ३० दिवसांच्या आत/ अपवादात्मक परिस्थितीत ६० दिवसांच्या आत पडताळणी करुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी / उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे संबंधित विभागातील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाशी (P&GS Unit) सोबत जोडलेल्या प्रपत्र – ‘क’ येथील विहित नमुन्यात माहिती भरून संपर्क साधतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना मुख्य Highlights 

योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2016
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील मुली
योजना सुरू करणारे महाराष्ट्र सरकार
योजनेचा उद्देश मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
विभाग महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट- maharashtra.gov.in

माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र

 • अर्जदाराचे आधार कार्ड.
 • मिळकत प्रमाणपत्र.
 • BPL/APL श्रेणी रेशनकार्ड.
 • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
 • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
 • मुलीचे व मातेचे बँक पासबुक.
 • लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र.
 • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 • योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
 • अर्जदाराचे मोबाइल नंबर.
 • पासपोर्ट साईज फोटो. 

माझी भाग्यश्री कन्या योजना ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

राज्य भाग्यश्री कन्या योजना 2022 अंतर्गत राज्य सरकारने प्रदान केलेला निधी मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र सरकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल. यानंतर, ते जवळच्या महिला आणि बालविकास कार्यालयात सादर करावे लागेल. सर्व पात्र अर्जदार जे या योजनेसाठी अर्ज करू इच्छितात नंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज येथे क्लिक करा
पालकांचे स्वयंघोषणापत्र / हमीपत्र येथे क्लिक करा 
बालगृहे, शिशुगृहे किंवा महिला व बालविकास विभागाअंतर्गत
इतर निवासी संस्था येथील अधिकारी व जिल्हा बालविकास अधिकारी
यांच्याकडे करावयाचा अर्ज

येथे क्लिक करा.

योजनेबद्दल संपूर्ण माहिती येथे क्लिक करा 

 

 

विशेष सूचना:

आम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी कुटुंब असतील जे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या.जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

 

माझी कन्या भाग्यश्री योजना FAQ

1.माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज कोठे करावा?

Ans: माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय / महिला बाल विकास कार्यालय / अंगणवाडी मुख्य सेविका यांच्याकडे अर्ज करावा.

2.माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

Ans: माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

 

3.एका कुटुंबात तीन मुली असल्यास भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येतो का?

Ans: नाही

 

4.आधीचे अपत्य मुलगी असताना दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का?

Ans: हो.

5.माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

Ans: मुलींच्या संख्येमध्ये सुधार करणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि मुलींना पुढील जीवनात स्वावलंबी बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने हि योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.

 

 

सारांश

आशा करत आहे कि माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले माझी कन्या भाग्यश्री योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा. अधिक माहिती साठी आपल्या www.dailyupdateshq.com फॉलो करा. आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.